कढीपत्त्याची चटणी: दोन ते तीन महिने टिकणारी खमंग चटणीची साधी आणि सोपी रेसिपी

तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल किवा तिळाची खोबऱ्याची पण आज आपण दोन ते तीन महिने टिकणारी बहुमूल्य कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत. बाजारामध्ये गेलं तर आपण कढीपत्ता थोडा का असेना घेतो का तो फ्री मध्ये भेटतो कारण आपल्याला फ्री मध्ये घ्यायला आवडतं, थोडा का असेना पण आवडतं, कढीपत्ता जेवणामध्ये वापरतात तुम्हाला माहिती आहे किती बहुगुणी आहे डोळ्यांसाठी केसांसाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच आपण कढीपत्त्याला आपण बहुगुणी म्हणतो थोडा का असेना आपण जेवणामध्ये वापरतो पण आज आम्ही 40 रुपयाचा घेऊन आलो आहोत. आज आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहोत इतकी छान लागते की चटणी आपण दह्यासोबत खाली तर किवा भातासोबत चटणी घालून खाली छान लागते, किंवा तेल आणि चटणी सोबत भाकरी खा खूप छान लागते, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 

 साहित्याची यादी खालीलप्रमाणे 

  1. कढीपत्ता – २.५ ते ३ कप
  2. उडदाची डाळ – २ चमचे
  3. शेंगदाणे – १/२ कप
  4. फुटण्याची डाळ – १/४ कप
  5. सुकं खोबरं – २ टेबलस्पून
  6. जिरं – १ चमचा
  7. लसूण – ७-८ पाकळ्या
  8. मिठ – चवीनुसार
  9. चिंच – २-३ पाकळ्या
  10. मिरची पावडर – २-२.५ चमचे (चवीनुसार)
  11. तेल – २ चमचे (आवश्यकतेनुसार)

कृती कढीपत्त्याची चटणी

१) कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता तरी ते मी अडीच ते तीन कप भरून त्याची पानं घेतली आहेत.

२) कढीपत्त्याची पाने काढून मी ती धुवून घेतले आहेत आता तिथून धुवून घेऊन चाळणीवर पाणी निघून जाण्यासाठी ठेवा.

कढीपत्ता - २.५ ते ३ कप
कढीपत्ता

जितका शक्य होईल तितका यामध्ये पाणी काढून याला कोरड करून घ्या. 

३) थोड्या वेळासाठी कढीपत्ताला बाजूला ठेवा आता आपण बाकीचे काम करुन घेऊ आता आपण कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेऊ कढीपत्ता आपलं बहुगुणी आहे तसेच तेल सुधा चांगले वापर करा, तेल चांगलं तापवून घ्या.

४) आता त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचे दोन चमचे उडदाची डाळ आपण मंद गतीने खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे आणि त्या डाळीचं हल्का रंग बदलेल तोपर्यंत भाजून घ्या.

उडदाची डाळ २ चमचे
उडदाची डाळ

५) भाजून घेतल्यानंतर उडदाची डाळ आपण तेलातून काढून घेऊ तुम्हाला वाटलं तर तेलात डाळ भाजायचे नाही तर तुम्ही अशीच कोरडी भाजून घेऊ शकता. 

६) आता डाळ भाजून घेतले आता पाव कप शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा थोड्याशा तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यावे. शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून घ्या आता उडदाची डाळी मध्ये शेंगदाणे पण काढा.

शेंगदाणे
शेंगदाणे

५) आता कढईमध्ये पाव वाटी फुटण्याची डाळ भाजायचे आहे ही डाळ फार भाजण्याची गरज नाही एक दीड किवा दोन मिनिट फक्त भाजून घ्या सगळे भाजून घेण्याचे कारण म्हणजे चटणीला खमंग यावा आणि ती लवकर बाद होऊ नये म्हणून. 

फुटण्याची डाळ
फुटण्याची डाळ

६) आता कढईमध्ये दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कस भाजायचा आहे. सुख खोबरं भाजताना तेल वगैरे घालायची गरज नाही कारण सुकं खोबऱ्यांमध्ये स्वतःचा तेल असतं. आता खोबर सुद्धा चांगल कुरकुरीत भाजून घ्या आणि खोबर सुद्धा कढईतून काढून घ्या.

सुकं खोबरं २ टेबलस्पून
सुकं खोबरं

७) आता कडई मध्ये अगदी चमचाभर असं तेल घेतले आता तेलामध्ये आपल्याला घालायचं एक चमचा जिरं आणि सोबत सात-आठ लसणाच्या पाकळ्या लसणाच प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याला तुम्ही थोडा वेळ भाजू द्यावे.

जिरं आणि लसूण
जिरं आणि लसूण

८) लसूण जिरे भाजून घेतले आता लसूण आणि जिरं कडईतून काढून घेऊ.

९) आता सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचे कढीपत्ता कढीपत्त्याला छान खुळखुळ असा आवाज येईपर्यंत चांगल भाजून घ्यायचे. तुम्ही हवा तर तेलात भाजू शकता नाहीतर असा सुद्धा छान भाजला जातो. छान असा कोरडा होईपर्यंत त्यातलं पाणी आहे ते निघून जाईपर्यंत छान भाजून घ्या. कढीपत्ता भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनिटे लागली. मध्ये मी चमचाभर तेल सुद्धा घातलं कारण की तो पटकन भाजला जावा म्हणून. 

कढीपत्ता चटनिसाठी भाजुन घेणे
कढीपत्ता

१०) आता आपलं सगळं साहित्य थंड झालंय आता यामध्ये घालायचं आपल्या चवीपुरतं मीठ दोन ते तीन चिंचेच्या पाकळ्या घालायच्या दोन ते अडीच चमचे मिरची पावडर किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यावर कढीपत्ता मिसळून घ्यावा.

मिरची पावडर, मिठ, चिंच
मिरची पावडर, मिठ, चिंच

११) आता हे सगळं साहित्य आपल्या मिक्सरला लावून बारीक करून घ्यावे आता आपल्या कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे. 

कढीपत्त्याची चटणी
कढीपत्त्याची चटणी

१२) आता ही चटणी थोडा वेळ ताटामध्ये पसरून ठेवा ही चटणी काचेच्या भरणी  मध्ये भरून ठेवल्यास जवळपास दोन ते अडीच महिने आरामात टिकते. फक्त याला पाण्याचा हात लागू देऊ नका. 

आता ही चटणी आपण कशाप्रकारे खाऊ शकतो आणि कशी खायची 

वाटीभर दही घट्ट असं घ्यायचं त्यामध्येही चमचभर चटणी टाकून ज्वारीचे भाकरी सोबत खाऊ शकता नाचणीच्या भाकरी सोबत खाऊ शकता किंवा श्रेया ज्वारीच्या पॅकेज बरोबर एक नंबर लागते.

 

Leave a Comment