आज आपण साध्या सोप्या पद्धतीत खुसखुशीत कुरकुरीत ताटाची शोभा जीबीची चव वाढवण्यासाठी लसणाची चटणी पाहणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होते आणि ती महिनाभर स्टोअर करून ठेवता येते घरामध्ये भाजीसाठी काय नसेल तर तुम्ही लसणाची चटणी बरोबर भाकरी किंवा चपाती खाऊ शकता इडली डोसा बरोबर खाऊ शकता रेसिपी बरोबर टिप्स सुधा सोबत मी तुम्हाला दिली तर मग नक्की वाचा.
साहित्य:
- तेल: अर्धा पळी
- मोहरी: अर्धा पळी
- जिरा: अर्धा चमचा
- बेडगी मिरच्या: 4-5
- शेंगदाणे: 50 ग्रॅम
- सुख खोबरे: पाव कप (25-30 ग्रॅम)
- लसूण: 25-30 पाकळ्या
- पांढरे तीळ: 2 चमचे
- हळद: अर्धा चमचा
- हिंग: पाव चमचा
- कोल्हापुरी घाटी मसाला: 2 चमचे
कृती लसणाची चटणी
१) सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त आम्ही अर्धा पळी तेल घेतल आहे तेल खूप कमी लागते या चटणीला चांगलं कडकडीत हे तेल गरम करून घ्यायचे आहे.
२) ते तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आम्ही अर्धा पळी मोहरी टाकली आहे मोहरी चांगली फुलल्यानंतरच येते अर्धा चमचा जिरा घालायचे आहे जिरानी मोहरी चांगली तडतडू द्यायचे आहे.
३) आणि त्यानंतर आम्ही इथे चार ते पाच बेडगी मिरच्या तुकड्यांमध्ये घेतले आहेत आणि बियांचा भाग काढून टाकायचा आहे आणि फक्त मिरच्यांचे वरचं टरफल घ्यायचं आहे कारण बिया घातल्यामुळे लसणाची चटणी थोडी तिखट होते जर तुम्हाला तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही बिया सुद्धा वापरू शकता. हे अगदी मंद गतीने 1 मिनिट परतून घ्यायचा आहे.
४) त्यानंतर आपण त्यामध्ये 50 ग्रॅम शेंगदाणे टाकून ते आम्ही भाजून घेणार आहोत शेंगदाणे अगदी मंद गतीने दोन मिनिट अगदी लालसर आणि खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊ खूप जास्त भाजायचं पण नाही आणि कच्च सुद्धा ठेवायचं नाही.
५) शेंगदाणे लाल खरपूस भाजल्यानंतर आपण येथे पाव कप आणि वजने म्हणाल तर 25 ते 30 ग्रॅम आणि चमच्याने म्हणाल तर चार चमचे भरून सुख खोबरे घेतल आहे. तुम्ही यामध्ये खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे चिरून सुद्धा वापरू शकता. खोबरे भाजायला वेळ लागत नाही काही मिनिट मध्यम गॅसवर ठेवून हे खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर हलका फुलका सुगंध येतो. यानंतर आपण खोबर सुद्धा चांगला भाजून घेतला आहे.
६) यानंतर 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या सालं न काढता सालासकट वापरले आहेत त्या यामध्ये टाकणार आहोत यामुळे आपले चटणी चिकट होत नाही आणि चटणीला चांगली चव सुद्धा येते त्यांनतर अगदी सुटसुटीत आणि मस्त तयार होते लसूण सुद्धा एक मिनिट खरपूस असे भाजून घेणार आहोत.
७) लसूण चांगल्या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर आम्ही त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घेणार आहोत पांढरे तीळ नसतील तर तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता दोन चमचे वापरू शकता यामध्ये चांगले तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत.
८) तीळ भाजून घेतल्यानंतर चटणीची रेसिपी आणखी चांगली दिसणार आहे त्यानंतर सर्व गोष्टी चांगले भाजल्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घेणार आहोत पाव चमचा मध्ये हिंग घेणार आहोत.
९) त्यानंतर आपण दोन चमचे भरून कोल्हापुरी घाटी मसाला घेणार आहोत तुम्ही साठवणीच तिखट असेल ते सुद्धा वापरू शकता हे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. लाल बिडकी मिरच्या पण चटणीला कलर चांगला येतो पण बिडगी मिरची अजिबात तिखट नसतात. म्हणून वेगळे आपण इथे तिखट वापरल आहे.
१०) पुन्हा मिनिटभर आपण सर्व मसाले चांगले भाजून घेतले आहेत. आणि या स्टेजला पण गॅस बंद करायचा आहे. आणि सगळे मसाले आपल्याला एकदम असे थंड करून घ्यायचे आहेत.
११) थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले आपण काढून घेणार आहोत मिक्सर लाऊन घेणार आहोत.
१२) चटणी जर तुम्हाला महिनाभर ठेवायचे असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत आणि मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत मीठ तुमच्या चवीनुसार यामधील मीठ घालू शकता. आपण यामध्ये अर्धा चमचा साधा मीठ वापरला आहे. आता पाणी न वापरता आपण चटणी तळून घेणार आहोत तेल कमी वापरायचा आहे बिलकुल ते आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही.
१३) त्यानंतर आपली जर अशी चटणी आपण तळून घेतलेली आहे ही लसणाची चटणी एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि चांगली टिकावदार झाली आहे.
१४) अशी ही चटणी तुम्ही थंड करून घ्या आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेऊन घ्या आणि महिनाभरासाठी तुम्ही वापरू शकता एकदाच महिनाभरासाठी बनवून ठेवा महिनाभर वापरू शकता आणि वडापाव सुद्धा खाऊ शकता गरमागरम तुम्ही बेसन बनवताय किंवा पिठलं बनवता त्याच्यावर भाकरी सोबत पिठलं आणि चटणी खाऊ शकता ते सुद्धा एक नंबर लागतं.
१५) ते सर्व सुक्या आणि कोरड्या भरणी मध्ये भरून घ्यायचं बाहेर भरणी मध्ये तुम्ही एक महिनाभर ठेवू शकता आणि फ्रिज मध्ये ठेवायच असाल तर ते तुम्ही दोन किंवा अडीच महिने ठेवू शकता.
कोणत्याही भाजीसाठी तुम्ही वापरले तरीही चटणी तर ती भाजी सुद्धा खूप चांगली बनते.
आता चटणी कुरकुरीत खुसखुशीत कशी वाटली ती तुमचा कमेंट करून मला जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणी सोबत जास्तीत जास्त शेअर करा.