नमस्कार मित्रनो आम्ही आज नवीन रेसिपी बघतोय ती म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून बनवले जाणारी पुदिन्याची चटणी रेसिपी महिनाभर टिकणारी आहे.
त्यासोबत भरपूर सारी गुणकारी आहे कारण उन्हाळ्यामध्ये ना भरपूर सारे लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत उष्णतेमुळे त्रास होतात या त्रासांवर हे गुणकारी चटणी फायदेशीर ठरणार आहे पण त्यासोबत जास्तीत जास्त जेवणाचे रंगतही वाढणार आहे.
पुदिन्याच्या चटणीसाठी साहित्य:
- हिरवागार पुदिना – 2 जोड्या
- कोथिंबीर – 1 मोठा गुच्छ
- कच्चे शेंगदाणे – ½ वाटी
- फुटाण्याची डाळ – ¼ वाटी
- लाल मिरची – चवीनुसार
- हिरवी मिरची – चवीनुसार (वैकल्पिक)
- लसूण – 10-15 पाकळ्या
- सुख खोबरं – 1 कप
- तेल – 1 चमचा (भाजण्यासाठी)
- मीठ – चवीनुसार
- खडीसाखर – 1 चमचा
- लिंबाचा रस – ½ चमचा
कृती
१) पुदिना चटणीसाठी मी या ठिकाणी दोन जुळी छान असा हिरवागार पुदिना घेतलाय. आता हा पुदिना कसा निवडायचा ते तुम्हाला सांगते पुदिन्याचा सर्वांत वरच टोक धरायचे शेंडा खुडून घ्यायचा आणि नंतर उरलेली पान विरुद्ध दिशेने उडायची बघा अगदी पटकन हे संपूर्ण पानं एकाच वेळेला निघून येतात आणि अगदी याच पद्धतीने मी संपूर्ण पुदिना पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही पुदिना निवडून घेऊ शकता.
२) तर बघा संपूर्ण पुदिना माझा छान असा निवडून झालाय साधारणतः दोन बाऊल हा पुदिना भरला असेल आता हा आपल्याला छान असा दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून नंतर कोरडा करून घ्यायचा आहे.
३) तर बघा पुदिना सुकल्यानंतर तुम्ही एका ताटामध्ये काढून घेतलाय हा माझा दोन बाऊल होता.
४) तर त्याच प्रमाणात घेतलेलं इतर साहित्य बघूयात एक मोठी हिरवीगार छान अशी कोथिंबीर कापून घेतले अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, पाव वाटी फुटाण्याचं डाळव याला डाळ देखील म्हटलं जातं चवी नुसार लाल मिरची यावेळी तुम्ही हिरवी मिरची ही वापरू शकता. आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसणामुळे देखील चटणीला टेस्ट छान येईल संपूर्ण साहित्य आपण एक एक करून छानसं भाजून घेऊया
५) तवा ठेवायचा त्यात अगदी थोडसं तेल टाकायचे तेलामुळे या डाळ्या आणि शेंगदाणे छान असे खमंग भाजले जातील चटणीला टेस्टही छान येईल आता आपण हे एकदम कमी गॅसवर सतत हलवत रंग बदलेपर्यंत किंवा मग कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्या.
६) तर बघा काही वेळानंतर आपले शेंगदाणे छान असे भाजले गेले आहेत डाळवांचा रंग देखील बदललाय आता हे तुम्ही थंड होण्याकरिता ताटामध्ये काढून घ्या.
७) आणि सेम कढईमध्ये पुन्हा एकदा भाजून घेऊ सुख खोबरं तर सुख खोबरं चांग्ल्या पद्धतीने कापून घ्या नाहीतर तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता
८) आता हे देखील आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत आणि सोबतच हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खोबर भाजायला वेळ कमी लागतो त्यामुळे एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचे बघा सुकं खोबरंही छान असं भाजून झालं ते देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घ्या.
९) पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल टाकले आता यामध्ये भाजून घेऊयात लाल मिरच्या आणि सोबतच लसूण आता हा देखील चांगला रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्या.
१०) तर बघा हे देखील साहित्य छान असं भाजलं गेलेलं आहे हे देखील थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घ्या.
११) आता भाजणार आहोत मगाशी जी कोथिंबीर घेतलेली होती ती मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली ही आता ही आपल्याला अजिबात तेल न टाकता छान अशी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची.
१२) कोथिंबीर आणि पुदिना छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेतलं की यामधील संपूर्ण मॉइश्चर निघून जाईल म्हणजेच ओलावा निघून जाईल आणि यामुळे आपली चटणी महिना काय दोन महिने देखील अजिबात खराब होणार नाही जशी त्या तशी छान अशी टिकून राहील.
१३) कोथंबीर छान अशी भाजून झालेली आहे परतवून झालेली आहे आता ही देखील मी एका ताटामध्ये थंड होण्याकरता काढून घेते. लवकर थंड होणं देखील गरजेचे आहे.
१४) आता भाजून घेऊयात सेम पद्धतीने पुदिना, हा पुदिना एकदम छान असा कोरडा करून घ्या सुती कापडाने पुसून घेतलेला घ्या यामुळे यामध्ये देखील अजिबात पाणी नाहीये आता हा देखील आपण छान असा एकदम ड्राय होईपर्यंत कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहे जोपर्यंत यातील संपूर्ण ओलावा जात नाही.
१५) तोपर्यंत कोथंबीर आणि पुदिना देखील आपल्याला एकदम कमीच गॅसवर भाजून घ्यायचे कारण हे भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो आणि मंद गॅसवर भाजलं की ते व्यवस्थित भाजलं देखील जातं तर बघा याचा रंग बदललाय थोडासा डार्क रंग आला आहे ही पान थोडीशी चुर्गल्यासारखी दिसतात या पणांन देखिल कोरडे पणा आला.
१६) आता या वेळेला हे देखील मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेते आता आपलं संपूर्ण साहित्य तर बघा आपल्याकडे हे साहित्य देखील छान असं थंड झालेला आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं खोबऱ्याला छान असा कुरकुरीतपणा आलाय ही पाने देखील छान अशी थंड झालेली आहेत ती आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी दळून घेणार आहोत.
१७) त्यामुळे हे संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या एवढ्यात जरी साहित्य या चटणी मध्ये घातलं तर देखील या चटणीला छान असे टेस्ट येते परंतु याची चव आणखी जास्त वाढण्याकरिता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ एक चमचा खडीसाखर साखरे ऐवजी तुम्ही खडे साखर वापरा कारण उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर ठरते आणि यामुळे चटणीला चवही छान येईल चटणीला थोडासा आंबटपणा येण्याकरिता अर्धा चमचा लिंबाचा रस यामुळे पुदिन्याचा रंगही जास्त काळापर्यंत टिकून राहील.
१८) आता संपूर्ण साहित्य मिक्सर छानसा बारीक दळून घेऊया तर बघा या ठिकाणी आपली छान अशी पुदिनाची खमंग चटणी तयार झाली आहे. या पद्धतीने हे मी मिक्सरला दळून घेतली अगदी मोकळी सुटसुटीत महिनाभर टिकणारी उन्हाळ्यातील भरपूर साऱ्या आजारांवर गुणकारी फायदेशीर ठरणारी ही चटणी तयार झालेली आहे.
हे तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून वाडा सोबतच दह्यासोबत देखील खाऊ शकता यामुळे उन्हाळ्यात होणारा मायग्रेनचा त्रास उष्णतेचा त्रास पित्ताचा त्रास अवश्य दूर होईल आपली मुलं देखील उन्हामध्ये फारच खेळतात त्यांना खूप प्रमाणामध्ये होते अशा वेळेला ही चटणी त्यांना जर खायला दिली तर नक्कीच फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय.